हे आहेत आमचे आधारस्तंभ

 

कै. प्र. मो. शं. हुजुबाजार :

सेवा निवृत्त गणित विभागप्रमुख, विज्ञान संस्था, मुंबई, गणितवरील उत्कृष्ट प्राध्यापक शालान्त परीक्षा मंडळ, गणितविषय प्रमुख. मुंबई विद्यापिठात गणित विषय अभ्यासमंडळाचे अध्यक्ष. विद्‍वत सभा अ‍ॅकॅडमिक कौन्सिलचे सदस्य. १९७६ मध्ये फेलो, महाराष्ट्र अ‍ॅकॅडेमि ऑफ सायन्स हा बहुमान प्राप्त. भारतातीलपरदेशातील संशोधन नियतकालिकांत लेख प्रसिद्‍ध.

 

ग्रंथ निर्मिति :

१. संच उपपत्ती १९७४

२. आधुनिक अमूर्त बीजगणित

३. Text Book of Algebra (१९७९)

४. Text Book of Mathematical Analysis (१९८०)

 

वरील पैकी पुस्तके ३ व ४ ही दोन्ही पुस्तके COSIP - ULP in Mathematics या प्रकल्पांतर्गतटात MC Grew Hill ने प्रकाशी केली होती.

गणित मंडळाच्या स्थापनेपासु मंडळास त्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभेल.

 

कै. वा. के. वाड. एम. ए. बी. टी :

१९५७ ते १९७८ मुख्याध्यापक, महाराष्ट्र हायस्कूल , दादरपरळ (मुंबई). नवगणितासाठी शिक्षक उद्‍बोधन वर्गास तज्ज्ञ मार्गदर्शक. ‘गणित शिक्षण’ त्रैमासिकशैक्षणिक नियतकालिकांमध्ये उद्‍बोधक लेखन. गणित विषय विद्यार्थ्यांना सोपा मनोरंजक वाटावा या धडपडीतून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित : गणित गप्पा, गणितातील चाकोरीबाहेरील वाटा, मेंदूला खुराक, गणित सागरातील वेचलेले मोती, गणित प्रज्ञातंञ, गणिताशी गट्टी, Talent Maths without Tears, Conceptual Maths याशिवाय गणिताच्या पाठयपुस्तकांचे लेखन.

मुंबई गणित मंडळ आयोजि प्रज्ञावर्गास अनेकवर्षे मार्गदर्शन

मंडळाच्या प्रत्येक शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन निस्वार्थ मार्गदर्शनसहकार्य

 

कै. डॉ. वि. गो. कुलकर्णी :

निवृत्त संचालक, होमी भाभा विज्ञान केंद्र.

गणित विषयात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मकगणित (Remedial Mathematics) ही संकल्पना राबविली.

शालेय गणितविज्ञान विषयांच्या संवर्धनासाठी व्याख्यानेलेखमाला प्रसिद्‍ध.

 

 

प्रा. मु. ल. वैद्‍य :

मिठीभाई कॉलेजचे निवृत्त प्राचार्य. उच्चमाध्यमिकपदवी अभ्यासक्रमासाठी असलेल्या गणित विषयाच्या पाठयपुस्तकाचे लेखन. शालेय शिक्षकांसाठी आयोजित नवगणिताच्या वर्गांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य. बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळाच्या स्थापनेपासून मंडळास सहकार्यसल्लागार.

 

श्री. पु. ग. तथा भय्यासाहेब वैद्‍य :

लक्ष्मणराव आपटे प्रशाला, पुण्या चे संस्थापकप्राचार्य. अभिनव कला विद्‍यालय ऑफ आर्किटेक्ट, पुणे येथे व्हिजिटिंग लेक्चरर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हयुमन डायनामिक्स या संस्थेत एक वर्ष अध्ययन. गणित शिक्षणतंञज्ञान शाखा लॅग्बरो युनिव्हर्सिटी, इंग्लंड येथे ’कोलंबो प्लॅन’ साठी निवड. बर्डो नंबरचे विषेश संशोधन. गणित, विज्ञानशिक्षण या विषयांवर विविध नियतकालिकांतून ३०० हून अधिक लेख प्रसिद्‍ध. इ. ८ वी  ते  १२ वी च्या गणित विषयाच्या पाठयपुस्तकाचे लेखन. विज्ञान  कथा , गणित काल्पनिका , गणित रंजन विषयाची ३०० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित. आकाशवाणीदूरचिञवाणीवर व्याख्यानेकथाकथन. लेखनशैक्षणिक, सामाजिक कार्याबद्‍दल राज्यराष्ट्र पातळीवर एकूण १५ पुरस्कार प्राप्त.

 

श्री. दि. स. तांबोळकर, पुणे येथे वास्तव्य :

भारत इंग्लिश स्कूल पुणे येथे गणितविज्ञान विषयांचे अध्यापन व याच शाळेचे प्राचार्य पद.

महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ, पुणे या संस्थेचे संस्थापक सदस्य महामंडळाच्या स्थापनेपासून १९७४ ते १९८५ पर्यंत महामंडळाच्या विस्तारासाठी तन मनधन लावून कार्यरत. गणित विषयाच्या पाठयपुस्तक लेखनात सहभाग. शालांत परीक्षा मंडळामध्ये गणित विषयाचे तज्ञसमन्वयकम्हणून कार्य. बृ. गणित अध्यापक मंडळाच्या स्थापनेपासून मार्गदर्शकविकासामध्ये सल्लागार म्हणून महत्वाची भूमिका.

 

कै. म. ज. फडके :

सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उत्कर्ष मंदिर, मालाड.

संचालक, जवाहर बालभवन केंद्र, मालाड.

शिक्षक मार्गदर्शकव्यापक कार्यक्रम

विश्वस्त, श्री. समर्थ व्यायाम मंदिर, दादर.

पाध्यक्ष, दादर सार्वजनिकवाचनालय.

बृहन्मुंबई गणित अध्यापकमंडळाचे संस्थापकसदस्य, अध्यक्षआजीव सदस्य.

मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात मार्गदर्शनसक्रिय सहभाग. गणित विषयासाठी अनेक नियतकालिकांमधून लेखन तसेच आकाशवाणीवरुन विद्यार्ध्यांना उत्तम मार्गदर्शन.

मुख्याध्यापकांसाठी लिहिलेली तसेच ‘मुख्याध्यापकविकास दैनंदिनी’ चे महाराष्ट्रातील अनेक शालांना विनामुल्य वितरण. ‘आदर्श शिक्षकराज्यपुरस्कार’ (वर्षे १९७८-७९)

दि. ५ सप्टेंबर १९७९ रोजी प्राप्त. बृहन्मुंबई गणित अध्यपकमंडळाच्या कार्यात सिंहाचा वाटा.

 

 

श्री. श्री. ना. पडळकर :

निवृत्त प्राचार्य, पार्ले टिळकविद्यालय, विलेपार्ले.

गणित विषयाचे अनेक वर्षे अध्यापन. हसत खेळत गणित शिकवणारे विद्यार्ध्याचे आवडते गणित शिक्षक. शैक्षणिकनियतकालिकांमधून गणितामधील कूटप्रश्न, लेख प्रसिध्द, मनोरंजनातून गणित, गणितामधील कूट्प्रश्न हे त्यांचे वैशिष्ट्य.

बृहन्मुंबई गणित अध्यापकमंडळाच्या स्थापनेपासून मंडळाला मार्गदर्शनकार्यात योगदान. गणित प्रज्ञावंतांसाठी मोलाचे मार्गदर्शन.

 

श्री. म. स. पेठे :

परांजपे विद्यालय, माध्यमिकशाळा, अंधेरी येथे जून १९७० ते सप्टेंबर १९९० पर्यत मुख्याध्यापक सर्वच शालेय विषय. अध्यापक मंडळाच्या स्थापनेसाठी प्रोत्साहनसहकार्य १९८२ ते १९९० पर्यंत मंडळासाठी परांजपे विद्यालय येथे कचेरीसाठी पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या संमतीने विनामूल्य जागा उपलब्ध करुन दिली. मंडळाच्या कामात कार्यकर्त्यांना नेहमीच सहकार्य केले.

 

डॉ. हेमचंद्र प्रधान :

डॉ. हेमचंद्र प्रधान हे जेष्ठ व्याख्याताहोमी भाभा सेंटर फॉर सायन्स चे केंद्रप्रमुख म्हणून निवॄत्त झाले. मुंबई विद्यापिठातून B.Sc.M.Sc.  या दोन्ही परीक्षामधे ते सर्वप्रथम आले. त्यांनी त्यांचा डॉक्टरेट चा अभ्यास अमेरिकेतील मॅसॅच्युसेट विद्यापीठातून पूर्ण केला. त्यासाठी अणुकेंद्रकीय भौतिकी हा विषय त्यांनी घेतला होता. प्रधान सरांनी पोस्ट डॉक्टरेट विस्कॉसीन विद्यापीठातून पूर्ण केली. नंतर भारतात परत येवून अविरतपणे त्यांच्या आवडीचे शिकवण्याचे काम आहे.

 

श्री. भालचंद्र नाईक :

श्री. भालचंद्र नाईक हे व्ही. जे. टी. आय अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून सेवानिवॄत्त झाले. वैदिक गणिताचे ते गाढे भ्यासक.

M.E. ( सिविल) (संरचनात्मक विषय) , D.B.M.
सेवा निवृत्त जेष्ठ प्राध्यापक, संरचनात्मक इंजीनियरिंग विभाग,
व्ही. जे. टी. आय. , मुंबई.
कार्यवाह सह कोषाध्यक्ष, I.S.T.T. वी. जे. टी. आय. प्रकरण.
सहकार्यवाह, मुंबई ग्राहक पंचायत.
योग प्राध्यापक , योग विद्या निकेतन.
राष्टीय योग्यता शिष्यवृत्ती (S.S.C.E. to B.E.)
सर्वश्रेष्ठ शिक्षक राज्यपुरस्कार.