यांचा आम्हाला अभिमान आहे!

     

बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळाच्या या कार्यकर्त्याच्या शैक्षणिक कार्याची नोंद शासन दरबारी होऊन यांना गौरवपूर्ण पुरस्कृत करण्यात आले.

 
alt  

१. कै. म. ज. फडके

सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उत्कर्ष मंदिर, मालाड.

शिक्षक क्षेञातील कार्याबद्‍दल ‘आदर्श शिक्षक राज्यपुरस्कार’ (वर्षे १९७८-७९) दि. ५ सप्टेंबर १९७९ रोजी प्राप्त. बृहन्मुंबई गणित ध्यापक मंडळाच्या कार्यात सिंहाचा वाटा.

     
 alt  

२. श्रीमती. शर्मिला श्रीकांत कर्वे

१९७४ ते २००० परांजपे विद्यालय, अंधेरी येथे पर्यवेक्षिका.

१९८४ ते १९९३ मंडळाच्या कार्यवाह.

१९९० ते १९९६ महामंडळाच्या कार्यवाह.

२००० पासून मंडळाच्या अध्यक्षा.

वर्षे १९९५-९६ साठी माननीय राष्ट्रपती श्री. शंकरदयाळजी शर्मा यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षिका’ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

     
alt  

३.श्रीमती. निर्मला अच्युत घाटे

१९६७ पासून श्री. माधवराव भागवत हायस्कूल येथे गणिताचे अध्यापन१९९८ साली या शाळेच्या मुख्यध्यापिका म्हणून सेवानिवृत्त.

१९८४ ते १९९३ मंडळाच्या कोषाध्यक्ष.

१९९३ ते २००० मंडळाच्या कार्यवाह.

     
alt  

४. श्रीमती. रचना शास्त्री

बृहन्मुंबई म्यु. सेकंडरी स्कूलमधून सेवा निवृत्त शिक्षिका.

     
alt  

५. श्री. श्रीधर घरत

चिकित्सकसमूह शिरोडकर हायस्कूल, गिरगाव, येथे गणितविज्ञान या विषयांचे अध्ययन. १९९९ पासून गणित मंडळ मुंबईचे अनुक्रमे सदस्य. सहकार्यवाहउपाध्यक्ष.

महाराष्ट्र शासनातर्फे ‘आदर्श शिक्षिक’ राज्यपुरस्कार प्राप्त.

     
alt  

६. श्री. वा. के. वाड

बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळाचे आधारस्तंभ.

विद्यार्थीशिक्षकांच्यांत गणिताची आवड निर्माण करण्यासाठी धडपडणारे, अभ्यासू, व्यासंगीगणित विषयाची प्रज्ञावंतांसाठी अनेक पुस्तके लिहिणारे तज्ज्ञ.

सप्टें. २००२ रोजी महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन त्यांचा बहुमान केला गेला.

     
alt  

७. श्री. बा. भा. जाधव

उपाध्यक्ष बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळ, मुंबई.

प्राचार्य राजा रामदेव पोदार प्रशाळा, सांताक्रु(प.)

मिनिस्ट्री ऑफ सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी तर्फे ‘सायन्स पॉप्युलरायझेशन’ साठी सन्मानित केले जाते.

National Award for outstanding efforts in science - popularisation among children’ हा किताब विज्ञानदिन २०११ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला.