गणित संबोध परीक्षा :

बृहन्‌मुंबई गणित अध्यापक मंडळ , मुंबई तर्फे गणित संबोध परीक्षा  इ.५ वी  व  इ.८ वी ह्या दोन इयत्तांसाठी होते.

 

उद्‌देश :         

ही परीक्षा घेण्यामागचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना मागी इयत्तांमधील संबोध किती समजले आहेत हे जाणून घेणे हा आहे.

ही स्पर्धा परीक्षा नाही. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मागील इयत्तांमधील मुलभूत संबोधांचे किती आकलन झाले आहे हे समजून घेणे हे ह्या परीक्षेचे उद्‍दीष्ट आहे. त्यासाठी ह्या परीक्षांचा निकाल त्या त्या केंद्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने सोडविलेल्या प्रश्नांनुसार विश्लेषित करुन दाखविला जातो.या निकालाचा वापर करुन विद्यार्थ्यांना कोणता भाग येत नाही हे सहज समजू शकते.सोबत अशा दोन निकालांचे विश्लेषण आहे. कच्च्या संबोधांची नोंद करुन त्यांचे दृढीकरण करुन घेता यावे ह्यासाठी परीक्षा वर्षाच्या सुरुवातीला घेतली जाते. तेव्हा  इ. ५ वी  व  ८ वी च्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी त्यामुळे  इ. ५ वी   व  ८ वी च्या महत्वाच्या स्तरावर त्यांच्या ञुटी समजल्यास उपचारात्मक उपाय करणे शक्य होईलगणिताबद्‍दलची नावडअपयश दूर करण्यास नक्कीच मदत होईल. अर्थातच ह्या उद्‍देशामुळेच प्रत्येक शाळा ह्या परीक्षेत सामील व्हावी अशी अपेक्षा आहे. परीक्षेसाठी प्रवेश शाळेतूनच दिला जाईल, वैयक्तिकरित्या कोणताही विद्यार्थी ह्या परीक्षेस बसू शकणार नाही.

विद्यार्थी सादरीकरण

 

परीक्षेचे माध्यम : मराठी / इंग्रजी / हिंदी / गुजराती / उर्दू.

 

अभ्यासक्रम :      इ.५ वी - १ ली तेथी पर्यंतचा गणिताचा सर्व अभ्यासक्रम.

                      इ.८ वी - १ ली तेवी पर्यंतचा गणिताचा सर्व अभ्यासक्रम.

 

प्रश्नपत्रिकेचे स्वरुप वेळ :

                      ५० बहुपर्यायी प्रश्न.

                      १०० गुण , २ तास वेळ.

 

संदर्भ पुस्तके :     इ. ५ वी :- १ ली तेथी गणिताची पाठयपुस्तके.

                                बृहन्‌मुंबई गणित अध्यापक मंडळाने प्रकाशित केलेले ‘गणित संबोध’ (इ. ५ वी) हे पुस्तक .

 

                      इ. ८ वी :- १ ली तेवी गणिताची पाठयपुस्तके.

                                बृहन्‌मुंबई गणित अध्यापक मंडळाने प्रकाशित केलेले ‘गणित संबोध’ (इ. ८वी) हे पुस्तक .

 

 

परीक्षा शुल्क :     रु. २५ मात्र ( प्रति विद्यार्थी).

                      ( महानगर पालिका शाळासांठी  रु. २०  प्रति विद्यार्थी )